थोड्या दिवसांपूर्वीच apple ने त्यांच्या नव्या (आणि बाकीची खूप सारी विशेषणं तुम्हाला माहितीच आहेत म्हणून लिहित नाही) operating system ची ओळख करून दिली! जगातली सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत मोबाइल operating system अशी ओळख करून देत टिम कुक ने खूप टाळ्या घेतल्या. आपल्याकडे मोबाइल म्हणाला तर नोकिया या अशा जनरेशन मधून आपण आता मोबाइल म्हणाल तर Samsungच अशा जनरेशन कडे जातोय. या सगळ्यामध्ये Apple त्याचा खास दर्जा राखून आहे. तुम्हाला काय वाटतंय? हेच खासपण या नव्या IOS7न जपलंय? Apple आणि Samsung हे दोनही फोन समोर असल्याने माझ्या काही टिपण्ण्या इथे थोडक्यात मांडतो. आणखी सविस्तर चर्चा करायची असेल तर जरूर लिहा.
Steve Jobs नेहमी म्हणायचा. “It all just works!” कितीही आवाज केला तरी IOS7 किंवा कोणत्याही IOS मध्ये जो fineness आहे, तो आजतागायत मी कोणत्याही दुसर्या मोबाइल operating system मध्ये पाहीलेला नाही. जवळपास पण नाही! हे IOS7 मधेही खूप ठळक दिसून येतं! आणि जे काही आहे ते खूप सुंदर दिसत! आता हे बोलून काही ठराविक गोष्टींकडे वळू.
एखाद्या Android User ने जर बघितला, तर त्याला यामध्ये खूप गोष्टी अशा वाटतील की “अरे हे तर माझ्या फोन मध्ये आधीपासूनच आहे!” लॉक स्क्रीन, नोटीफिकेशन सेंटर, कंट्रोल सेंटर या गोष्टी खूप आधीपासून Android मध्ये आहेत. IOS7 ने त्याच्या खास शैलीमध्ये त्या आता iPhoneमध्ये आणल्यात. दिसतात सुंदर. पण देर आये दुरुस्त आये. असेच म्हणेन. कारण लॉक स्क्रीन मध्ये Android फोनमध्ये खूप शक्यता आढळतात. Google Now हे खूप सुंदर काम करतं एखाद्या नोटीफिकेशन साठी. आणि हे खूप आधीपासून उपलब्ध आहेच. IOS च्या या ही आवृत्तीमध्ये विजेट्स चा समावेश केलेला नाहीये! यामूळे थोडासा catch upसुरु आहे असा feel येतो.
पण दोन गोष्टी IOS7 मध्ये खूप छान जमून गेलेत. एक म्हणजे Airdrop आणि दुसरं म्हणजे कॅमेरा. Samsung ने डोक्यावर घेतलेल्या NFC technology ची टर उडवत, एक सोपी file sharing ची पद्धत म्हणून airdrop ची ओळख करून दिली.
एकमेकांमध्ये फाईल पाठवायची असेल तर आपले फोन फक्त एकमेकांना टेकवायचे. हे म्हणजे NFC (Near field communication). AirDrop ने हे सगळे सोप्पे केले. आता फोन बडवण्याची गरज नाही असे सांगून लोकांची करमणूकही केली.
airdrop ही सुविधा फक्त IOS7 वाल्याच फोन मध्ये करता येते हा छोटासा तपशीलबाजूला ठेवला तर खूप सोपं करून टाकलय. कॅमेरा बद्दल पण हेच आहे. तसं बघाल तर Android Camera खूप सारे options देतो. पण खरच कोण किती वापरू शकत असेल देव जाणे? पण IOS7 ने हे खूप सोप्या पद्धतीने मांडलय. खूप सहज वापरता येतील अशा प्रकारे. दिल खुश हो गया देखके.
शेवटी एक गोष्ट अजूनही बदलेली नाहीये. IOS7 सहज वापरता येतील अशा प्रकारे गोष्टी मांडून देते. तर Android खूप सारे options देऊन, एक वेगळा अनुभाव तयार करू शकतो.
IOS7 बद्दल इथे वाचायला मिळेल – apple.com/ios/ios7/. तुम्हाला आणखी काही खास गोष्टी माहिती असतील तर जरूर सांगा. चर्चा करायला आवडेल.