नमस्कार सुजनहो!
जीवनशैली
आज मयूरपंख या पहिल्यावहिल्या जीवनशैलीला वाहिलेल्या मराठी साईटची सुरुवात करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
मुळात जीवनशैली म्हणजे काय असं म्हटलं तर माणसाच्या आजूबाजूच्या घटकांचे त्याच्या जीवनाच्या विविध अंगांवर होत जाणारे परिणाम असं ढोबळ मानानं म्हणता येईल.
मग घरापासून ते पालकत्वापर्यंत आणि फॅशनपासून ते कलेपर्यंत असा जीवनशैलीचा विस्तृत आलेख देखील मांडता येईल. उदारीकरणाचे बरेवाईट परिणाम बघत मोठी झालेली आजची तरुण पिढी एका मोठ्या आर्थिक स्थित्यंतरातूनही गेली, किंबहुना आताही जाते आहे. त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारलं, पर्यायाने त्यांची जीवनशैलीही खर्या अर्थानं गेल्या काही वर्षात कमालीची बदलली आहे.
कामाच्या बदललेल्या वेळा, हातात खेळणारा पैसा, अत्यंत वेगवान जीवन या सगळ्याच बाबींनी आजच्या पिढीचं जगणं कमालीचं बदलत चाललं आहे.
नवीन लेख
वेगवेगळ्या विभागांत जीवनशैलीच्या वेगवेगळ्या घटकांना स्पर्श करण्याचा आमचा मानस आहे.
किमया गार्निशिंगची
आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी , प्रत्येक ठिकाणी अतिशय महत्वाचा असा घटक म्हणजे सजावट. मग लग्न , पार्ट्या, कोणताही सण, समारंभ , कौटुंबिक कार्यक्रम येथील प्रत्येक गोष्टीच्या सुरेख सादरीकरणासाठी सजावट ही आलीच. मग पाककला तरी यात मागे कशी राहील? संभ्रमात पडलात ना ! अहो.. अगदी पूर्वीच्या काळीसुद्धा साधा स्वयंपाक त्याची चव त्यातील पौष्टिक घटक, रंगांपर्यंत घरातील…
मनस्वास्थ्य आणि सकारात्मक मानसशास्त्र
रात्रीची वेळ… मंद पिवळा प्रकाश आणि एका लग्नातील वरातीतलं दृश्य.. आपल्याच धुंदीत नाचणाऱ्या वर्हाड्यांमध्ये चार-पाच आगंतुक तरुण दाखल होतात आणि तेही नाचू लागतात. सगळेच बेभान! इतक्यातच त्यांच्यापैकी एक स्टायलिश तरुण खिशातून बंदूक काढतो. आणि मजामस्तीतच खेळातली बंदुक असल्याप्रमाणे बार काढतो. क्षणार्धात सगळं चित्रच पालटतं. कारण गोळी खुद्द नवरदेवाला लागलेली असते आणि तो घोड्यावरच निष्प्राण होऊन पडलेला असतो.
“वाडा संस्कृती’’
‘निंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’ वर्षानुवर्षाचे हे बालगीत म्हणताना मामाचा तो चिरेबंदी वाडा कायमच सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि बऱ्याच जणांच्या मनात घर करून बसलेला वाडा जुन्या आठवणी ताज्या करतो. पण हल्लीच्या नवीन पिढीला या बालगीतातून वाडा म्हणजे काय निदान ते तरी समजावून सांगता येईल? तसं ‘वाडा’ म्हंटल की आठवतं ते पुणे.. आणि ‘पुण्याचे…
नवीन लेख
मराठीत या विषयाला केंद्र्स्थानी ठेवून काहीतरी करावं, या उद्देशाने ‘मयूरपंख’च्या कल्पनेची सुरुवात झाली. या साईटवरील वेगवेगळ्या विभागांत जीवनशैलीच्या वेगवेगळ्या घटकांना स्पर्श करण्याचा आमचा मानस आहे.
What They Say
खूप सुंदर लेख आहे. वेळ काढून नक्की वाचा.
सौ. मंजिरी गोडबोले.
खूप सुंदर लेख आहे. वेळ काढून नक्की वाचा.
मृदूल कशेळकर
खूप सुंदर लेख आहे. वेळ काढून नक्की वाचा.