Mayurpankh

कला / संस्कृती

यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व

मुराकामी वाचून झपाटून गेल्यानंतर जपानी साहित्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी इतर जपानी लेखकांचा शोध घेणं सुरू झालं. काझुओ इशिगुरो सापडला पण इशिगुरोचा जन्म पूर्वेकडचा असला तरी त्याचं सर्व आयुष्य इंग्लंडमध्ये गेलं, शिवाय तो लिहितो इंग्रजी भाषेत आणि बरेचदा त्याच्या लिखाणाचे विषय ब्रिटिश असतात. अर्थात’ऍन आर्टिस्ट इन अ फ्लोटिंग वर्ल्ड’ सारखे युद्धानंतरच्या जपानी समाजाच्या नैतिकतेचा धांडोळा घेणारे अपवाद आहेतच. मग […]

यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व Read More »

The Champa Flower- I

समज मी सोनचाफ्याची कळी झाले गंमत म्हणून, आणि उमलून आले झाडावर उंच, त्या फांदीवर लहानशा पानांसोबत हासत खेळत, वार्‍यावरती झोके घेत; तर सांग ना आई, तू ओळखशील मला? तू इकडे तिकडे शोधत हाक मारशील, ’अगं चिऊ, कुठे गेलीस?’ आणि मी हासेन माझ्याशीच- मनातल्या मनात, गालातल्या गालात मी हलकेच माझ्या पाकळ्या उमलून बघत राहीन तुला रांगोळी

The Champa Flower- I Read More »

अचाट आणि अतर्क्यः इमान धरम

रंगीत टीव्ही भारतात आले आणि मला हिंदी सिनेमे पहायची सवय लागली. पुढे थेटरातल्या खुर्चीच्या हातावर तोल सावरून तीन तास बसता येऊ लागले(‘असं का?’ म्हून इचाराल तर तेवा का नाई माजी उंची वाईच कमी हुती! समोरचा सिनेमा दिसायला खुर्चीच्या हातावर बसणे आवश्यक असे.) तेव्हा थेटरात जाऊन सिनेमे पहायची सवय लागली. पुढे उंची वाढल्यावर नीट खुर्चीत बसून

अचाट आणि अतर्क्यः इमान धरम Read More »

आनंददायी छंद

‘हा छंद जीवाला लावी पिसे’ अशा गाण्याच्या ओळी ऐकून खरचं छंदाबद्दल विचार करायला लागले की छंद म्हणजे नक्की काय? छंद ही खरोखरच अशी गोष्ट आहे जी आपण रिकामेपणी सहजगत्या करू शकतो. छंद हा एक प्रकारचा उद्योग आहे जो कंटाळा आल्यावरही आपण करू शकतो. छंद आपल्या मनाला विश्रांती देतो आणि करमणूकही करतो. छंद हा एखाद्याच्या आवडीवर

आनंददायी छंद Read More »

Scroll to Top