आहार आणि आपण
आपण आहार का घेतो? उत्तर अगदी सोपे आहे ! आपली भूक भागविण्यासाठी . हे जरी खरं असले तरी त्याला आणखीही कारण आहे. आहार हा केवळ भूक भागविण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरविण्यासाठी घेतला जात नसून प्रामुख्याने शरीराचे पोषण करण्यासाठी असतो.आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराला अनेक जीवनसत्वांची आवश्यकता असते. शरीराच्या वाढीसाठी, रचनात्मक जडणघडणीसाठी तसेच स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठीही प्रथिनांची गरज […]