आरोग्य
मनस्वास्थ्य आणि सकारात्मक मानसशास्त्र
रात्रीची वेळ… मंद पिवळा प्रकाश आणि एका लग्नातील वरातीतलं दृश्य.. आपल्याच धुंदीत नाचणाऱ्या वर्हाड्यांमध्ये चार-पाच आगंतुक तरुण दाखल होतात आणि तेही नाचू लागतात. सगळेच बेभान! इतक्यातच त्यांच्यापैकी एक स्टायलिश तरुण खिशातून बंदूक काढतो. आणि मजामस्तीतच खेळातली बंदुक असल्याप्रमाणे बार काढतो. क्षणार्धात सगळं चित्रच पालटतं. कारण गोळी खुद्द नवरदेवाला लागलेली असते आणि तो घोड्यावरच निष्प्राण होऊन पडलेला असतो.
खाद्यपदार्थांतील ऍक्टिव्हिटीज
एखाद्या अन्नपदार्थात अनेकविध कारणांमुळे समाविष्ट केलेले घटक म्हणजे ऍक्टिव्हिटीज. खाद्यपदार्थांमध्ये मूलतः ऍक्टिव्हिटीज आढळून येत नाहीत. आज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये २८०० हून अधिक ऍक्टिव्हिटीज वापरले जातात. यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रीझर्व्हेटीव्ह्ज, अनैसर्गिक स्वीटनर्स आणि रंग हे सध्या सर्वाधिक प्रचलित आहेत. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्याच्या दृष्टीने प्रीझर्व्हेटीव्ह्ज, मधुरता आणण्यासाठी स्वीटनर्स, त्यांना एक सुरेख लुक देण्यासाठी रंग तर रुचकर बनवण्यासाठी…
जंक फूडची क्रेझ
बदलती जीवनशैली आणि राहणीमानामुळे लहान मुलांच्या भावविश्वात खूप बदल होत आहे. या वेगाने बदलत्या युगाशी जुळवून घेण्यासाठी नाती, जीवनशैली यांत अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत, आहारही याला अपवाद राहत नाही. आरोग्यपूर्ण आहाराची जागा अलीकडे जंक फूडने घेतली आहे. जंक फूड म्हणजे काय तर पटकन उपलब्ध असलेले, सोयीस्कर आणि फॅशनेबल फूड. हे जंक फूडच जाळं समाजातील…
योग शास्त्र : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी
व्यायामाचं अस्सल पारंपारिक शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योग हे एक असे विज्ञान आहे ज्याला तात्विक आधार आहेत. पारंपारिक योगशास्त्रामधून विकसित झालेली व्यायाम पद्धती ही केवळ बाह्य शरीराचे पोषण करीत नाही तर ती मानसिक स्वास्थ्याचा सुद्धा खोलवर विचार करते. व्यायामाचे महत्व सांगताना आम्हा व्यायामप्रेमींना आणि प्रशिक्षकांना नेहमी एका प्रश्नाला तोंड यावे लागते की, आपण व्यायाम का करायचा?…
आहार आणि आपण
आपण आहार का घेतो? उत्तर अगदी सोपे आहे ! आपली भूक भागविण्यासाठी . हे जरी खरं असले तरी त्याला आणखीही कारण आहे. आहार हा केवळ भूक भागविण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरविण्यासाठी घेतला जात नसून प्रामुख्याने शरीराचे पोषण करण्यासाठी असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराला अनेक जीवनसत्वांची आवश्यकता असते. शरीराच्या वाढीसाठी, रचनात्मक जडणघडणीसाठी तसेच स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठीही प्रथिनांची…