आपल्यापैकी किती लोक फोनने फोटो काढतात? कदाचित सगळेच. किंबहुना फोन असेल तर आपण वेगळा कॅमेरा घेतच नाही. पूर्वी एक काळ होता जेव्हा कॅमेराने फोटो घ्यायचा आणि मग तो कॉम्पुटरवर घेऊन त्यात दुरुस्त्या करायच्या आणि मग तो लोकांना दाखवायचा किंवा अपलोड करायचा, असं सगळं असायचं. खूप दिवस झाले मला असलं काही केलेलं आठवतच नाही! आता फोटो तर फोनवर काढता येतातच पण ते एडीटपण फोनवरच करता येतात. खूप सुरेख आणि सुटसुटीत apps सध्या उपलब्ध आहेत. त्यातले माझे आवडते २ खाली मांडतोय, जे मी बऱ्याचदा वापरतो. तुम्हाला याहून वेगळे आणि विशेष काही माहिती असतील, तर जरूर लिहा.
खूप प्रसिद्ध free apps पैकी हे एक.
खास: फेसबुकशी निगडीत असल्याने, फोटो शेअर करणं खूप सोपं आहे. बाकी apps च्या तुलनेमध्ये हे पूर्वीपासून उपलब्ध असल्याने, Instagram वापरणारे लोक खूप भेटतात. Instagram वापरणाऱ्या इतर लोकांनी काढलेले फोटोही इथे बघता येतात (Community). यामध्ये १५ सेकंदचा विडीओ पण रेकॉर्ड करता येतो आणि त्यालाही वेगवेगळे इफेक्ट देता येतात. ही सुविधा बहुधा बाकीच्या फोटो एडिटिंगच्या apps मध्ये नाहीये. Community मुळे, इथे वेगवेगळ्या hashtag वापरून फोटो शोधता येतात. खूप साऱ्या चर्चेत असलेल्या concerts वगैरेंचे फोटो इथे त्या त्या hashtagने लोकांनी अपलोड केलेले आढळतात. उदाहरणार्थ, #NH7 ने Instagram वर शोधले तर, मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे फोटो सापडतील.
न आवडलेलं: सगळे फोटो चौरसाकृतीच केले जातात. फक्त २० च इफेक्टचे पर्याय आहेत.
Pixlr Express
माझं सध्याचं आवडतं app. हे ही free आहे.
खास: फोटो एडीट करणं, वेगवेगळे इफेक्ट, फिल्टर, किंवा बोर्डर असे खूप सारे पर्याय यात उपलब्ध आहेत. नवे इफेक्ट येत राहतात. वेगवेगळ्या प्रकारचे ओवर-ले यामध्ये आहेत. फोटोंच छान कोलाजही यामध्ये बनू शकतं. फोटोवर स्टीकर लावता येतात, लिहिता येतं. एकूणच जे काही आपल्याला सुचेल त्या जवळपास सगळ्या गोष्टी यामध्ये करता येतात. प्रत्येक गोष्टींचे सुंदर आणि खूप सारे options यात उपलब्ध आहेत. शेवटी फोटो हव्या त्या साईज मध्ये पण save करता येतो. बऱ्याचदा मी केवळ साईज लहान करण्यासाठी हे app वापरतो. यामधील “Creative” या category मधले इफेक्ट खूप विशेष आहेत. जास्तीत जास्त १० फोटोंचे कोलाज यात बनवता येते. कोलाज मध्येही ५० पेक्षा अधिक प्रकारच्या मांडण्या करता येतात. प्रत्येक मांडणी मध्ये, प्रत्येक फोटो ला हवा तेवढा उठाव देता येतो. बऱ्याचवेळा मी PC वर इतके options सापडत नाहीत म्हणून सगळे फोटो फोन वर घेतो, Pixlr Express मध्ये एडीट करतो, कोलाज करतो.
न आवडलेलं: क्वचित कधीतरी खूप सारे options बघून गोंधळल्यासारख होण्याची शक्यता आहे. प्रत्येक इफेक्ट सुरुवातीला download करावा लागतो. Community वगैरे इथे काहीही नाही.
मोबाईल फोनचा सुळसुळाट आणि मोबाईलमय जग यावर मूक भाष्य करणारा एक खूप सुंदर विडीओ पहिला. I forgot my phone. कितीही सुंदर असला फोने तरी काही काळ यातले addiction बाजूला ठेवू.