Mayurpankh

गाणारे पक्षी

पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी काही टिप्स :

वेगवेगळ्या प्रकारच्या बिया मिश्रित असलेले बर्ड फूडचा उपयोग गाणाऱ्या आणि रंगबेरंगी पक्षांना आकर्षित करण्यासाठी होतो. त्यामुळे आपल्या बागेत येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी बर्ड फूड हा एक उत्तम मार्ग आहे. वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातात आणि पक्ष्यांसाठी, त्यांच्या घर बांधण्याच्या काळात बर्ड फूड म्हणजे आदर्श खाद्य आहे. पण त्यासाठी आपल्याला आपण ते फूड बागेत कोठे ठेवणार याचा अगोदर विचार करायला हवा. कारण पक्ष्यांमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. उदाः एखादा पक्षी हा मिनीलगतचे अन्न खाणे अधिक पसंत करतो तर काही छोटे, रंगबेरंगी ब्लू टीटसारखे पक्षी उडत उडत अगदी सहज बर्ड फीडर मधील अन्न खाऊन जातात. बर्ड टेबलचा वापर करून अशा दोन्ही प्रकारच्या पक्ष्यांचा समन्वय साधता येईल. आपण हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे कि भिंतीजवळ किंवा छतावर ठेवलेले फूड मांजरीसारखे प्राणी हिसकावून घेऊ शकतात. झाडाला लटकवलेले फीडर हेसुद्धा पक्ष्यांच्या उडण्याच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट आहे.
जितकी जास्त प्रमाणात फळझाडे, वेली आपल्या बागेत असतील तितकेच जास्त प्रमाणात पक्षी आकर्षिले जातील. झाडांचा पडलेला पालापाचोळा हा वेळोवेळी साफ केला पाहिजे कारण त्याखाली असलेले किडे आणि आळया ते खातील. बर्ड टेबल आणि बर्ड बॉक्स जर बागेत बसवले तर हे दोन्हीही आणि त्याचबरोबर गाणारे आणि सुंदर पक्षी आपल्या बागेत येण्यास सुरुवात होईल. पक्षी बागेत येण्यासाठी आणखी एक उत्कृष्ट योजना म्हणजे बर्ड बाथ आपल्या बागेत बसवणे. पक्षी आपले पंख साफ करताना पाहणे आणि नंतर ते पंख उन्हात वाळवताना बघणे ही लहान मुलांसाठी एक पर्वणीच आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये पक्ष्यांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते कारण बरेच कीटक मरून जातात आणि खाद्यही मिळेनासे होते. अशा वेळी पक्ष्यांचे खाद्य एखाद्या होलमध्ये ठेवावे, जेणेकरून त्याचे वाऱ्यापासून संरक्षण होईल आणि जमिनीवरचे खाद्य हे फीडिंग ट्रेमध्ये ठेवावे त्यामुळे पक्षी खाद्याचे थंडीमुळे गोठणे टळू शकेल. एक छान टीप म्हणजे कीटलीतील उकळलेले पाणी बर्ड बाथमध्ये ओतून ठेवल्यामुळे त्यांचे पाणी गोठणार नाही. बर्ड बाथ सोबतच आपण जुने फीडर रंगबेरंगी वूलचे धागे टाकून ठेवू शकतो आणि असे धागे पक्षी सहजपणे घेऊन उडू शकतात आणि आपली रंगबेरंगी घरटी बंधू शकतात. पण जे वूलचे धागे आपण वापरू ते नैसर्गिक, लगेच तुटणारे आणि त्याचे लहान तुकडे असावेत ज्यामुळे त्यांना ते घेऊन उडणे सोपे जाईल. निदान एवढेतरी आपण आपल्या या छोट्याश्या मित्रांसाठी नक्कीच करू शकतो.

Email
Facebook
Twitter
Pinterest

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top