
असं म्हणतात, “घराला घरपण एक स्त्री देऊ शकते’’. पण सध्याच्या काळात घरपणाची संकल्पना बदलताना दिसते. त्यात चांगले ‘इंटीरियर डिझाईन’ याचा समावेश झाला असून, हे साकार करून देण्यासाठी इंटीरियर डिझायनर हे स्वप्न संपन्न करत आहेत. गृहसजावट म्हंटल कि त्यात घराला शोभेल असं फर्निचर, सुंदर फर्निशिंग, भिंतीवरचे सुंदर रंग, फॉल्स सिलींग आणि त्यामधले आकर्षित करणारे लाईट्स.
रंग म्हंटल कि आपल्याला आठवतो होळीचा सण. त्यात इतके विविध प्रकारचे रंग असतात आणि रंगासोबतच आपण हा सण साजरा करतो. हे रंग आपल्या मूडचा खूप मोठं कारण आहे. घरामध्येही अशीच एक भिंत असते ज्याला हायलाईट करू शकतो. आपल्याही घरामध्येही अशीच एक भिंत असावी. उदाहरणार्थ डायनिंग रूम मध्ये अथवा बेडरूम मध्ये बेडच्या मागची भिंत हायलाईट करू शकतो. बरयाच जणांना असा प्रश्न असतो कि नक्की कुठली भिंत हायलाईट करावी? याला उत्तर आसे आहे , ज्या भिंतीवर सूर्यप्रकाश चांगल्या प्रमाणात आहे ती भिंत हायलाईट करावी. याला कारण आसे कि जर कमी सूर्यप्रकाश असलेली भिंत हायलाईट केली तर ती स्वच्छ दिसणारच नाही.
रंग कुठल्या प्रकारचे निवडावेत?
सध्या मार्केट मध्ये खूप प्रकारचे पेंट्स उपलब्ध आहेत. त्यापैकी चांगला निवडावा, पण असा निवडावा जो आपल्या फर्निचर सोबत शोभेल. आपल्या घरात कोणत्या प्रकारचं फर्निचर आहे, कोणते रंग त्या बरोबर शोभतील याचा विचार करावा. कोणताही रंग निवडताना आपली रूम किती मोठी किंवा छोटी आहे याचा प्रामुख्याने विचार करावा. हॉल मध्ये पांढऱ्या रंगाचा जास्त उपयोग केला जातो. कारण पांढरा रंग हा शांत आहे. या रंगा सोबत कुठल्याही प्रकारचे फर्निचर खुलून दिसते आणि स्वच्छता हि दिसते. हिरवा रंग खूप ‘फ्रेश लूक’ देतो. गडद रंग शक्यतो वापरू नयेत. कारण त्यामुळे रूम छोटी दिसते. रंगांचा वापर हा खूप विचारपूर्वक केला गेला पाहिजे.